Thane: अल्पवयीन मुलींना देहव्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक
अंजू सिसोदिया आणि सोनिया सिसोदिया अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
Thane: दोन अल्पवयीन मुलींना देहव्यापारात (Flesh Trade) ढकलल्याप्रकरणी ठाण्यातील मानवी तस्करी विरोधी कक्षाने (Anti-Human Trafficking Cell) (एएचटीसी) गुरुवारी दोन महिलांना अटक केली. कल्याण (Kalyan) मधील अनिल पॅलेस लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये (Anil Palace Lodging and Boarding) या महिलांना पकडण्यात आले. (वाचा - Mumbai: मनालीहून आणलेल्या चरसचा पुरवठा करणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्याला अटक; 1.5 लाखांहून अधिक किमतीचे चरस जप्त)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील (Mahesh Patil) यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते बिनू वर्गीस (Binu Varghese) यांच्याकडून माहिती मिळाली होती की, महिला 17 वर्षांच्या दोन मुलींना प्रत्येकी दीड लाख रुपयांना विकण्यासाठी आणत आहेत. (हेही वाचा - Viral Video: मोटारसायकलवर धोकादायक स्टंट करणाऱ्या दोन तरुणाविरोधात व्हिडिओवरून वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, Watch)
लॉजवर एका डिकॉय ग्राहकासोबत सापळा रचून मुलींची सुटका करण्यात आली. अंजू सिसोदिया आणि सोनिया सिसोदिया अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्या दोघी 35 वर्षांच्या असून त्या नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी आहेत.
उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्या देहव्यापारात गुंतल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आरोपी महिलांविरोधात भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.