Raigad Nagothane Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 25 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल शुक्रवारी रात्री भीषण अपघात (ST Bus Accident) झाला. यामध्ये बसेस समोरासमोर धडकून 25 प्रवाशी जखमी झाले.

MSRTC | (Photo credit: archived, edited, representative image)

Raigad Nagothane Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) भीषण अपघात झाल्याची घटन घडली आहे. यामध्ये दोन एसटी बसेस (ST Bus Accident) समोरासमोर धडकल्या. यात 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळ हा अपघात घडला आहे. मुंबईवरुन राजापूरकडे जाणाऱ्या बसला मुंबईकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे काहीकाळ महामार्गावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. सध्या गणेशोत्सवामुळे मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात त्यांच्या गावी जात आहे. (हेही वाचा: Chembur Road Accident: चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात भरधाव कारचा अपघात; दुभाजकावर आदळून टँकरला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू)

दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणकरांसाठी ज्यादा बसेस सोडल्या आहेत. या एसटी बसेस कोकण ते अगदी गोव्यापर्यंत धावत आहेत. आपघातासाठी महामार्गाची वाईट अवस्थाही कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. सुदैवाने अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर नाही. मात्र, अपघातानंतर, सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यसरकारने अनेक मार्गावरून एसटींची संख्या कमी केली असून कोकणमार्गावर बसेसची संख्या वाढवली आहे.

रात्री मुंबईहून एसटी कोकणच्या दिशेने निघाली असताना हा नागोठणे इथे हा अपघात झाला. एसटी बसेस शिवाय खाजगी वाहनेही हजारोच्या संख्येने तळ कोकणात जाण्यासाठी बाहेर पडत आहेत. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळं महामार्गावर कोंडी होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now