Solapur Accident News: मलकापूर येथे दोन गाड्याचा भीषण अपघात, ट्रकला आग लागल्याने दोन चालकांचा मृत्यू

या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

Accident (PC - File Photo)

Solapur Accident News:  देशभरात सर्वीकडे स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष चालू असताना, सोलापूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर इदूंर महामार्गावर दुधाच्या टॅंकरचा आणि नारळाच्या ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला. या घटनेत नारळाच्या ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमेत आहे. या भीषण अपघातात नारळाच्या ट्रकला क्षणातच आग लागली आणि या आगीत दोन्ही चालक होरपळून जागीच मरण पावले. मलकापूर (Malkapur) तालुक्यातील घुस्सर फाट्या जवळ रात्रीच्या 9च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. जवळच्या पोलीसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. या दुर्घटनेचा पंचनामा केला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दूधाची टॅंकर हा बुलढाणा दिशेने जात होता. त्याच विरुध्द दिशेने येत असलेली नारळाचा ट्रक या दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली. जोरदार धडकेत नारळाच्या ट्रकला आग लागली. गणेश ब्रिजलाल पाटील याचाही या घटनेत मृत्यू झाला आहे.

या आगीत दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. एका चालकांला या आगीतून बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचरण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सद्या उपचार चालू आहे. रात्रीच्या वेळी ट्रक चालकाच्या वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडून आला आहे. असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif