Palghar: विरारमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू; 6 जण जखमी

यावेळी मिरवणुकीच्या वाहनावरील लोखंडी रॉड असलेला ध्वज ट्रन्सफॉरमरच्या संपर्कात आला. यामुळे वाहनातील सर्वांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात रुपेश आणि सुमितचा मृत्यू झाला. तर

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Palghar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) च्या पूर्वसंध्येला विरार (Virar) मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहरात आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात येत होती. लोखंडी रॉडवर फडकवलेल्या ध्वजाचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय या घटनेत सहा जण जखमी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मिरवणूक काढल्यानंतर घरी परत असताना वाहनावर बसवलेल्या लोखंडी रॉडवर ध्वज फडकवण्यात आला होता. या ध्वजाचा स्पर्श ट्रान्सफॉर्मरला झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, विरारमधील मनवेल पाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत दोन जणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुपेश सुर्वे आणि सुमित सूत अशी या मृत तरुणांची नावे आहेत. (हेही वाचा -Anandacha Shidha: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वितरीत करण्यात येणार 'आनंदाचा शिधा'; संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज)

रुपेश आणि सुमितसह सहा जण मिरवणूक संपल्यानंतर घरी परतत होते. यावेळी मिरवणुकीच्या वाहनावरील लोखंडी रॉड असलेला ध्वज ट्रन्सफॉरमरच्या संपर्कात आला. यामुळे वाहनातील सर्वांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात रुपेश आणि सुमितचा मृत्यू झाला. तर इतर सहा जण विजेच्या धक्याने गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच इतर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना नालासोपारा पूर्वमधील नागीनदासपाडा येथील नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. पोलिस या घटनेच्या अधिक तपास करत आहेत.