पुणे: मिलिट्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सैन्य भरतीच्या सरावादरम्यान 2 जवानांचा मृत्यू, 5 जण जखमी
या सरावादरम्यान 2 जवानांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. याबाबत एएनआय यांनी अधिक वृत्त दिले आहे.
पुणे येथील मिलिस्ट्री कॉलेजमध्ये सैन्य भरतीच्या सरावादरम्यान दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. या सरावादरम्यान 2 जवानांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. याबाबत एएनआय यांनी अधिक वृत्त दिले आहे. तर मीडिया रिपोर्ट्स नुसार, गुरुवारी जवान बॅली सस्पेंशन ब्रिज चढण्याचा सराव करत होते. त्याचवेळी ब्रिज वरुन चढत असताना तोल जाऊन खाली पडले. यामध्ये एक ज्युनिअर कमिशन ऑफिसर सुद्धा जखमी झाला आहे. मात्र सेनेच्या वतीने याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही.
आज जवानांना सस्पेंशन ब्रिज बनवण्याचा सराव सुरु होता. त्यावेळी सरावादरम्यान दुसऱ्या बाजूला उभारण्यात आलेला टॉवर खाली कोसळला गेला. टॉवर कोसळल्याने त्याखाली दोन जवान अकडले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. (पुणे: मेट्रोच्या क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू)
ANI Tweet:
पुणे मिलिट्री इंजिनिअरिंग कॉलेज हे भारतीय सेना प्रक्षिणासाठी प्रसिद्ध आहे. येथे कॉम्बेट इंजिनिअरिंग, मिलिट्री इंजिनिअरिंगस बॉर्डर रोड्स इंजिनिअरिंग सर्विसेज आणि सेनेच्या सर्वेबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रकरणी अधिक माहिती मिळण्याबाबत प्रतिक्षा केली जात आहे.