Maharashtra: दोन उच्चशिक्षित महिलांच्या आत्महत्याने नांदेडमध्ये खळबळ, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा पोलिसांनकडून प्रयत्न

मात्र, पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे ही माहिती दिली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न नांदेड पोलीस करत आहेत.

(Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

नांदेड शहरात (Nanded) एकामागून एक दोन उच्चशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील महिलांनी आत्महत्या केल्याने (Two Women Suicide) खळबळ उडाली आहे. आता या दोन महिलांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचे आव्हान नांदेड पोलिसांसमोर (Nanded Police) आहे. दोनपैकी एका महिलेने सुसाईड नोट लिहिली आहे. मात्र पोलिसांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या गोष्टी उघड करण्यास नकार दिला आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आत्महत्या केलेल्या पहिल्या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. आत्महत्या करणारी दुसरी महिला ही एका नामांकित डॉक्टरची पत्नी आहे. हिने गळ्यात गळफास लावून आयुष्य संपवल आहे. नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे नैराश्यात होती. मात्र, पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे ही माहिती दिली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न नांदेड पोलीस करत आहेत.

दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नांदेडमध्ये उडाली खळबळ 

नांदेडमध्ये आत्महत्येची पहिली घटना विवेक नगरमध्ये घडली. शिल्पा जिरोणकर हिचे पती गजानन जिरोणकर हे वकील आहेत. शुक्रवारी शिल्पा जिरोणकर यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. महिलेच्या गळ्यात फास होता. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवसही होता. वाढदिवसाची सर्व तयारी झाली होती. अखेर असे काय घडले की शिल्पा जिरोणकरने बाथरूमच्या शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली? पोलिसांनी शिल्पाची सुसाईड नोट सार्वजनिक करण्यास नकार दिल्याने सध्या तरी हे गूढ कायम आहे. मात्र शिल्पाचे सासरचे लोक पैशासाठी तिचा छळ करत होते, अशी फिर्याद शिल्पाच्या भावाने दिली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी शिल्पाच्या पतीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे. (हे ही वाचा Buldhana: डिजे बंद केल्याचा राग, जमावाकडून थेट पोलीस स्टेशनवर हल्ला)

आत्महत्येच्या दुसऱ्या घटनेबाबतही गूढ कायम 

आत्महत्येची दुसरी घटना पॉश भागातील शिवाजी नगर येथील आहे. शहरातील प्रसिद्ध त्वचा तज्ज्ञ डॉ.अर्जुन मापारे यांच्या सुनेने आत्महत्या केली आहे. त्यांचा मुलगा डेंटिस्ट डॉ.सागर मापारे यांची पत्नी अनुपा यांनी आत्महत्या केली आहे. मुलाला जेवण दिल्यानंतर अनुपा तिच्या खोलीत गेली. बराच वेळ आई बाहेर न आल्याने मुलाने दार ठोठावले असता त्याला आई आतून डोलताना दिसली. अनुपाच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर हतबल होऊन अनुपाने हे पाऊल उचलले आहे.

पण अनुपाच्या मित्रांना अनुपा हे करू शकते यावर विश्वास बसत नाही. काही दिवसांपूर्वी अनुपा मापारे यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने आत्महत्या केली होती. तेव्हा लोक आत्महत्या का करतात, असे अनुपा मापारे यांनी मैत्रिणींशी केलेल्या संवादात सांगितले होते. आयुष्य एकदाच येते. अशा सकारात्मक गोष्टी बोलणाऱ्या अनुपाने अचानक केलेल्या आत्महत्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिला अवाक झाल्या आहेत.