Maharashtra: मनमाडजवळ किसान एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले, पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवेवर परिणाम

रुळावरून घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

Train Derailment Representational Image (Photo Credits: ANI)

नाशिकच्या (Nashik) मनमाडजवळ किसान एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याची (Kisan Express Derailed Near Manmad) घटना समोर आली आहे. मनमाडपासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. ही ट्रेन पुण्याहून दानापूरकडे जात होती. मनमाडजवळ येत असताना त्याचे दोन डबे रुळावरून घसरले. वेग जास्त नसल्याने मोठा अपघात टळला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुळावरून घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. गेल्या १५ दिवसांतील हा दुसरा तर दोन महिन्यांतील चौथा रेल्वे अपघात आहे. दोन दिवसांपूर्वी हातिया-रौरकेला रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात रात्री 10 वाजता घडला, ही घटना कुर्सन रेल्वे स्थानकाजवळ घडली.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील उधमपूर-दुर्ग एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती. A-1 आणि A-2 AC डब्यांना आग लागली. हेतमपूर रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच या दोन्ही डब्यांना अचानक आग लागली. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. ट्रेन थांबवली. ट्रेनचे पुढचे भाग उर्वरित भागांपासून वेगळे केले गेले. त्यानंतरही मोठे अपघात होतच होते. (हे ही वाचा Pune Police on Exam Paper Leak: आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून धक्कादायक माहिती, न्यासा अधिकाऱ्यांचाच हात.)

महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे अपघात होतात

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी रेल्वे अपघातात दररोज 32 लोकांचा मृत्यू झाला होता. NCRB च्या अहवालात महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे अपघात झाल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्रात 1922 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशमध्ये 1558 लोकांचा मृत्यू झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now