Mumbai: नक्षलवादी असल्याचे भासवून डॉक्टरकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या बार डान्सरसह दोघांना अटक

नक्षलवादी असल्याचे भासवून 76 वर्षीय डॉक्टरला धमकावून त्याच्याकडून 50 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिअर बार डान्सरसह तीन जणांना शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नक्षलवादी असल्याचे भासवून 76 वर्षीय डॉक्टरला धमकावून त्याच्याकडून 50 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या बार डान्सरसह दोन जणांना मुंबई शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, निरीक्षक महेश तावडे (Inspector Mahesh Tawde) यांच्या नेतृत्वाखालील युनिट XII ने शुक्रवारी सापळा रचून बैसाखी विश्वास (Baisakhi Vishwas) (21), हयात शाह (Hayat Shah) (50) आणि त्याचा मित्र विक्रांत सुभाषचंद्र किरत (Subhashchandra Kirat) यांना अटक केली. बैसाखी बार डान्सर असून हयात आणि किरत गोरेगावच्या स्क्वॅटर कॉलनीमध्ये इस्टेट एजंट आहेत.

डॉ. वाडीलाल हे हयात आणि त्यांच्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर आहेत. हयातला डॉक्टरांचा तपशील माहित होता. त्यामुळे त्यांना सहज फसवले जाऊ शकते, असे त्याने आपल्या साथीदारांना सांगितले अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. (चंद्रपूर मध्ये 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरणकर्त्याने अभियंत्याची जिवंत जाळून केली हत्या)

तिघांनी गोरेगाव (ई) येथील क्लिनिकचे मालक असलेल्या डॉ. शाह यांना धमकीचे पत्र दिले. 15 सप्टेंबर रोजी घणसोली येथील रहिवासी बैसाखीने गोरेगाव येथील डॉक्टरांच्या क्लिनिकला बुरखा घालून भेट दिली आणि धमकीचे पत्र सोडले. ज्यात त्यांनी 50 लाख रुपयांची मागणी केली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की ते नक्षलवादी आहेत आणि जर त्याने पैसे दिले नाहीत तर ते त्याच्या एकुलत्या एका मुलाला ठार मारतील.

आरोपींना ऑनलाईन व्हिडिओ पाहून खंडणीची कल्पना सुचली. हयात आणि विक्रांत इस्टेट एजंट असून ते एकमेकांना ओळखतात. दोघांपैकी एकजण बैसाखीला ओळखत होता. त्यांनी तिला 50,000 रुपये कमिशन देण्याचे वचन दिले, अशी माहिती पोलिसानी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमान्वये धमकी आणि खंडणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.