Nashik Trimbakeshwar News: नाशिकमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू

आज दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर येथील 13 वर्षीय दोन मुली बिल्व तीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना एक मुलगी पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली असता दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Nashik Trimbakeshwar News: नाशिकमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू
Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar) येथे कपडे धुण्यासाठी बिल्व तीर्थ तलावावर गेलेल्या दोन तरुणींचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे त्र्यंबक शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात तीन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे त्र्यंबकवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्र्यंबकेश्वर येथील बिल तीर्थ तलाव हा मागील दोन वर्षांपासून गाळ आणि मुरूम काढून खोल केला आहे. (हेही वाचा - Juhu Resident Drowns In Dam: पिकनिकसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा अलिबागमधील कमर्ले धरणात बुडून मृत्यू; मृतदेह पाण्याखाली 30 फूट चिखलात अडकला)

आज दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर येथील 13 वर्षीय दोन मुली बिल्व तीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना एक मुलगी पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली असता दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळे पाण्यामुळे या दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरम्यान या ठिकाणी यापुर्वी देखील याठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने या तलावाकडे योग्य ती प्रतिबंधक उपाययोजना करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास कोरडे यांनी केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2024 08:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).