Tuljapur Crime News: कुत्र्याने मटण खाल्याचा राग, बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या; तुळजापूर तालुक्यातील घटना

येथील संतापलेल्या बापाने चक्क आपल्या विवाहीत मुलीवरच गोळीबार करुन तिची हत्या (Father Killed Daughter) केली. धक्कादायक म्हणजे ही घटना केवळ कुत्र्याने मटण खाल्ले येवढ्याच क्षुल्लक कारणावरुन घडली.

Pistol | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तुळजापूर (Tuljapur Crime News) तालुक्यातील कार्ला (Karla Village) गावात घडलेल्या घटनेने अवघा उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा हादरला आहे. येथील संतापलेल्या बापाने चक्क आपल्या विवाहीत मुलीवरच गोळीबार करुन तिची हत्या (Father Killed Daughter) केली. धक्कादायक म्हणजे ही घटना केवळ कुत्र्याने मटण खाल्ले येवढ्याच क्षुल्लक कारणावरुन घडली. आरोपी असलेला गणेश भोसले हा मुलीचा वडील दारुच्या नशेत तर्र होता. या नशेतच त्याने हे कृत्य केले आणि घटनास्थळावरुन पळ काढून तो फरार झाला. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

काजल शिंदे ही वीस वर्षाची विवाहीत महिला पतीसह आपल्या माहेरी आई-वडीलांकडे राहात होती. घटना घडली त्या दिवशी रविवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी काजलच्या घरी मटण आणले होते. काजल मटण बनवून भांडी घासण्यास गेली होती. इतक्यात कुत्र्याने डाव साधला. कुत्र्याने केलेल्या स्वयंपाकाजवळ प्रवेश करत घरातल्यांसाठी बनवलेल्या मटणावर ताव मारला. कुत्रा मटण खात असतानाच काजलची आई तेथे आली. कुत्र्याला पाहून काजलच्या आईचा पारा चढला. तिने कुत्र्याला हाकलले आणि निष्काळजीपणाबद्दल काजलला जाब विचारण्यास सुरुवात केली. या वेळी काजल आणि तिच्या आईमध्ये जोरदार वादावादी झाली. याच वेळी ही वादावादी ऐकून काजलचा बाप गणेश भोसले हा तिथे आला. त्याने घरातील खुंटीला टांगून ठेवलेली गावठी बंदूक काढली आणि काजलवर गोळी झाडली. गोळी छातीत वर्मी लागली. काजल खाली पडली. (हेही वाचा, Animal Abuse Viral Video: अमानुष अत्याचारामुळे कुत्रा जखमी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

घडल्या प्रकाराची नातेवाईकांना खबरबात लागली. त्यांनी घटनास्थळी हजेरी लावली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजलला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. काजलचे पती मनोज सुनील शिंदे यांनी काजलची आई मीरा भोसले आणि मुख्य आरोपी गणेश भोसले यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन नळदुर्ग पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच, आई मीरा भोसले हिला ताब्यात घेतले आहे. गणेश भोसले मात्र फरार झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत.