TTD Trust: शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जगनमोहन रेड्डी यांच्यात फोनवरुन चर्चा

आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh) काल (बुधवार, 15 सप्टेंबर) ही यादी जाहीर केली.

Milind Narvekar | (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक, शिवसेना (Shiv Sena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट बोर्ड (Tirumala Tirupati Devasthanams Trust Board) सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh) काल (बुधवार, 15 सप्टेंबर) ही यादी जाहीर केली. या यादीत देशभरातील 24 व्यक्तींचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट (TTD Trust ) हा भारतात सर्वात श्रीमंत ट्रस्ट म्हणून ओळखला जातो. देशातील लोकप्रिय अशा तिरुमला तिरुपती देवस्थान व्यवस्थापन पाहण्याचे काम या ट्रस्टकडे असते.

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानची ख्याती देशातील सर्वात प्रतिष्ठीत आणि लोकप्रिय अशी आहे. केवळ देशच नव्हे तर जगाच्याही कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या देवस्थानला मिळणाऱ्या देणग्या आणि निधी याची वार्षीक मिळकत करोडो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या देवस्थानच्या सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी देशभरातून मोठी स्पर्धा, चढाओढ असते. देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री हे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करुन टीटीडी ट्रस्ट सदस्य पदासाठी आपल्या राज्यातून एक नाव सूचवत असतात. (हेही वाचा, Milind Narvekar: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी)

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे असलेली पदं

मिलींद नार्वेकर ट्विट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी ( Y S Jaganmohan Reddy) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी यांच्यात फोनवरुन संवाद झाला. या संवादानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने एक अधिसूचना तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली.