Trimbakeshwar Temple: नव्या वर्षात त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाच्या दर्शनास मनाई? त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. या दरम्यान त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिराच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे.

Trimbakeshwar Temple: नव्या वर्षात त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाच्या दर्शनास मनाई? त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. तरी नव्या वर्षात म्हणजे २०२३ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली आहे. तरी हा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून घेण्यात आला आहे. त्र्यंबक मंदिर हे ऐतिहासिक मंदिर असुन या मंदिरच्या बांधकामास शेकडो वर्ष पुर्ण झाली आहेत. तरी मंदिर संरक्षण आणि संवर्धनाच्या पार्श्वभुमिवर मंदिराच्या देखभालीचं काम करण्यात येणार आहे. रोज हजारोंच्या संख्येने भाविक जोतिर्लिंगाच्या दर्शनास येतात दरम्यान हे काम करण्यास अवघड होते तरी हे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल ८ दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान भाविकांना जोतिर्लिंगाच्या दर्शनास तसेच मंदीर प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. देखभालीच्या या आठ दिवसातील कामादरम्यान मंदिर प्रशासना व्यतिरीक्त कुठल्याही व्यक्तीस प्रवेश नाकारण्यात आला आहे.

 

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. या दरम्यान त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिराच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी हे डागडुजीचं काम मंदिर संवर्धनासाठी करण्यात येत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी या सुचनेची नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन  त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (हे ही वाचा:- Dagdusheth Ganpati Temple Pune Timings On New Year: दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने नववर्षाची सुरूवात करायची आहे? पहा मंदिराच्या 31 डिसेंबर-1 जानेवारीच्या खास वेळा!)

 

त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पुढे आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याच दिसून येत आहे. तरी हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत असुन मंदिराच्या देखभालीच्या कामाचा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तरी लांबहून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. सर्वांना सुचना म्हणुनचं आठवडा भऱ्यापूर्वीच मंदिर प्रशानाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2022 11:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).