ED Summons Anil Parab: 'कार्यालयात हजर राहून जबाब द्या', परिवहन मंत्री अनिल परब यांना Money Laundering प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून पुन्हा समन्स

या समन्समध्ये अनिल परब यांना आपला जबाब ईडी कार्यालयात देण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यासाठी येत्या 28 सप्टेंबर रोजी ईडी (ED) कार्यालयात हजर राहा असे या समन्समध्ये म्हटले आहे.

Anil Parab | (Photo Credit : Facebook)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना पुन्हा एकदा समन्स (ED summons) पाठवले आहे. या समन्समध्ये अनिल परब यांना आपला जबाब ईडी कार्यालयात देण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यासाठी येत्या 28 सप्टेंबर रोजी ईडी (ED) कार्यालयात हजर राहा असे या समन्समध्ये म्हटले आहे. अनिल परब यांना ईडीने पाठवलेले हे दुसरे समन्स आहे. या आधीचे समन्स 31 ऑगस्ट रोजी पाठविण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जबाब नोंदणीसाठी वेळ देणया यावी अशी मागणी अनिल परब यांनी केली होती. ईडीने आता दुसरे समन्स पाठविल्यानंतर पुन्हा एकदा परब यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

अनिल परब यांना जेव्हा इडिचे पहिले समन्स आले होते तेव्हा त्यांनी त्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. त्याच ट्विटमध्ये अनिल परब यांनी आपण कायद्याची लढाई कायद्याद्वारेच लढू असे म्हटले होते. त्यांनी या वेळी भाजपवरही टीका केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात परब यांचे नाव घेतले गेले. त्यानंतर अनिल परब यांना समन्स बजावण्यात आले. (हेही वाचा, Maharashtra: शिवसेना नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीचा छापा)

अनिल परब यांच्या समन्स नंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली होती. ” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आणि बेहिशोबी मालमत्तांचे आरोप केले आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांनी इडीकडे तक्रार केली आहे. इडीनेही त्यांच्या तक्रारीची दखल घेत अनेकांना नोटीस दिली आहे.

.