Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरातील 28 पोलीस Deputy SP आणि ACP अधिकाऱ्यांच्या बदल्या

यात मुंबईतील 15 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Mumbai Police | File Image

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्राच्या गृह विभागाने (Maharashtra Home Department) आज राज्यभरातील 28 पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबईतील 15 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

एसीपी मृत्युंजय हिरेमठ यांची कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक (Dy SP), शशिकांत माने यांची CID चे Dy SP म्हणून बदली करण्यात आली आहे. तर कुमुद कदम यांची नाशिकच्या हायवे पोलीसच्या Dy SP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा -Maharashtra Assembly Elections 2024: चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांची मोफत ज्युसर मिक्सर देण्याची घोषणा; आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश)

निवडणुकीपूर्वी, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनी बुधवारी राज्यभरातील 300 हून अधिक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. सध्या सर्वत्र राजकीय पक्ष प्रचार सभांचे आयोजन करत आहेत. (हेही वाचा - Mumbai Cyber-Crime Cases: मुंबईत मागील वर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये 27% वाढ; ऑनलाइन फसवणूक 38% ने वाढली- Police Statistics)

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील 150 पोलिसांसह 260 हून अधिक पोलिसांची बदल्या केल्या. प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 36 जागा असलेल्या मुंबईत विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस प्रमुख यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पूर्णतः अंमलात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले होते.