ZP Teacher Transfer: जिल्हा परिषद शाळा शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
ह्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Zilha Parishad School: जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदांच्या शाळेतील शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. लवकर आंतरजिल्हा बदली जिल्हा परिषदांच्या शिक्षकांसाठी बंद होणार आहे. ह्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
नव्याने नियुक्तीनंतर जर शिक्षकाला इतर जिल्ह्यात जायचे असेल तर रितसर राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर पुन्हा विहीत प्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा द्यावी लागेल, त्या परिक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवावी लागेल.
जिल्हा परिषदांच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद करण्याची तरतुद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. गेल्यात वर्षी ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच, सदर बदल्यांमध्ये ज्या शिक्षकांनी विनंती केलेल्या आहे, ज्याना अजूनही बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षेवर ठेऊन जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना ग्रामविकास विभागाने देण्यात आल्या आहेत.