रहदारीच्या वेळी बंदीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई
अधिकाऱ्यांनी इशारा दिला की शनिवारपासून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर
मुंबईतील वाहतूक कोंडी (Traffick Jam) ही एक समस्याच होऊन बसली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील (Mumbai Road) वाहतूक कोंडीमुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या हजारो नोकरदार मंडळी आणि शहरातील नागरिकांचा अनाठाई वेळ जातो. तसेच, कामावरुन परतताना संध्याकाळीही अशिच स्थिती असते. या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यासाठी वेळापत्रक आखून दिले आहे. जी वाहने वेळापत्रकाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळी ठराविक तासांसाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची अधिसूचना पुन्हा जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी इशारा दिला की शनिवारपासून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.