महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल 8,232 पोलिसांना Covid-19 ची लागण तर 93 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरस संकट काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिसांभोवती देखील कोविड-19 चा विळखा बसला आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरस संकट काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिसांभोवती देखील कोविड-19 (Covid-19) चा विळखा बसला आहे. महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलातील तब्बल 8,232 पोलिसांनी कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1,825 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तर 6,314 पोलिस कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 93 पोलिसांना कोविड-19 च्या संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पोलिसांनी कोरोना व्हायरसच्या संकटात आपल्या जीवाची बाजी लावत अहोरात्र काम केले. तसंच आपल्या कर्तव्यापलिकडे जात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कार्य केले. यामुळे पोलिस यंत्रणेचे कौतुक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेळोवेळी केले आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित पोलिसांवर योग्य उपचार होतील, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही गृहमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. (कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलाचा सार्थ अभिमान म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेअर केला खास व्हिडिओ, Watch Video)
ANI Tweet:
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 2,54,427 पोहचला असून 10,289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,03,516 अॅक्टीव्ह केसेस असून 1,40,325 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. दरम्यान अनलॉकच्या टप्प्यातून जनजीवन पुन्हा सुरु होत असल्याने आणि काही शहारांमधील लॉकडाऊनमुळे पोलिस यंत्रणेवरील भार वाढत आहे.