धक्कादायक: 22 मार्चपासून आज पहाटे 4 वाजेपर्यंत 11 पोलीस अधिकाऱ्यांसह 38 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; महाराष्ट्र पोलिसांची माहिती

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत

Police| (Photo Credits: Maharashtra Police Twitter)

कोरोना विषाणूने (COVID19) सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी जिवापाड मेहनत करत आहेत. मात्र, 22 मार्चपासून आज पहाटे 4 वाजेपर्यंत 11 पोलीस अधिकारी (Police Officers) आणि 38 पोलीस कर्मचाऱ्यांना (Policemen) कोरोनाची लागण झाल्याची माहीती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 22 मार्चपासून आज पहाटे 4 वाजेपर्यंत  13 हजार 381 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, 41 हजार 768 वाहन जप्त केले आहेत. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. आता भारतातही कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. भारतात आतापर्यंत एकूण 18 हजार 601 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजार 252 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 666 वर पोहचली आहे. यापैंकी 232 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 572 जण कोरोनामुक्त झाले आहे. हे देखील वाचा- पालघर मॉब लिंचिंग घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या- रामदास आठवले

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असेही आवाहन त्यांनी केले होते. कोरोनाची लक्षणे लपवणे अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. थोडीशी जरी लक्षणे आढळली तर, तातडीने डॉक्टरांकडे जा असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.