Curfew Order in Pune: पुण्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश; घ्या जाणून कोणत्या ठिकाणी कलम 144 लागू?
म्हणजेच पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर कलम 144 (Section 144) लागू करण्यात आले आहे.
Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Torrential Rains in Pune) पडतो आहे. पुढील दोन दिवसांसाठी पुणे (Pune ) जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीदरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करु नये यासाठी अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जमावबंदी आदेश ( Curfew Order in Pune) काढण्यात आले आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर कलम 144 (Section 144) लागू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी स्थानिक जनजिवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती अधि वाढू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
कोणकोणत्या ठिकाणी जमावबंदी?
- सिंहगड किल्ला-
आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक मावळमधील किल्ले लोहगड ,किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग,डयुक्सनोज, भान लेणी,भाजे धबधबा, दुधी वरेखिंड,पवना परिसर, मावळमधील राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा
कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला
- एकविरा लेणी
- मुळशी परिसरातील अंधारबन ट्रेक,प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड भोर
रायरेश्वर किल्ला, किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर
मढेघाट जुन्नरमधील किल्ले जीवधन, बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट,गणपती मार्ग)
वरील सर्व ठिकाणी कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (हेही वाचा, Pune: पुण्यात पावसाचे थैमान; कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचे PMC चे खाजगी कंपन्यांना आवाहन)
दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता पाहून प्रशासनाने खासगी कंपन्यांना आणि उद्योगांना शक्य तितक्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि या दोन्ही शहरांलगत येणाऱ्या सर्व उपनगरांना लागू आहेत. त्यामुळे उद्या पुण्यामध्ये अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम संकल्पनेतून काम करण्याची शक्यता आहे.