Pune Toilet Seva App: पुणे महानगर पालिकेचे 'टॉयलेट सेवा ॲप, स्वच्छतागृहाची माहिती एका क्लिकवर मिळणार
या माध्यमातून आता पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’ हे ॲप आता शहरातील 1183 सार्वजनिक शौचालयांची सविस्तर माहिती देणार आहे.
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation ) अंतर्गत शहरातील स्वच्छतागृहाची माहिती आता एका ॲपवर पुणेकरांना मिळणार आहे. पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह माहिती देणाऱ्या ‘टॉयलेट सेवा ॲप’ (Toilet Seva App) चा पुढचा टप्पा महापालिकेने सुरु केला असून या माध्यमातून आता पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’ हे ॲप आता शहरातील 1183 सार्वजनिक शौचालयांची सविस्तर माहिती देणार आहे.
पाहा पोस्ट -
टॉयलेट सेवा ॲपच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असून या ॲपद्वारे आपल्याला पुण्यातील सार्वजनिक शौचालयांची माहिती एका क्लिकवर पाहता येणार आहे. आजच टॉयलेट सेवा ॲप डाऊनलोड करा! #ToiletSeva#CleanToilets pic.twitter.com/FaDX8VEz24
— PMC Care (@PMCPune) December 20, 2023
केंद्र सरकारच्या सन 2023 च्या 'स्वच्छ शौचालय' उपक्रमाच्या अनुषंगाने 'स्वच्छ शौचालय स्पर्धा' आयोजित करण्यासाठी हे ॲप उपयोगाचे ठरणार आहे. ॲपवर जवळचे स्वच्छतागृह शोधण्याबरोबरच वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायझर, कचराकुंडी, लाइट, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स आदी सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करुन दिली आहे. एक जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत पुणे शहरात स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे.
वापरकर्ते जवळचे शौचालय शोधू शकतात आणि महिलांसाठी वॉश बेसिन, पाण्याची उपलब्धता, लिक्विड साबण किंवा सॅनिटायझर, डस्टबिन, दिवे आणि सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता यासारख्या सुविधांची माहिती मिळवू शकतात. हे अॅप वापरकर्त्यांना अभिप्राय देण्यास आणि शौचालय सुविधा आणि स्वच्छतेबद्दल तक्रारी नोंदविण्यास अनुमती देते. वापरकर्ते रेटिंग देखील देऊ शकतात. सध्या दहा हजारांहून अधिक नागरिकांनी अॅप डाऊनलोड केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2023 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

