Today's Rain and Tomorrow's Weather: आजचा पाऊस, उद्याचे हवामान, कसे असेल मुंबईचे वातावरण? घ्या जाणून
Mumbai Rain Updats: 'आजचा पाऊस' (Today's Rain) मुंबईसाठी कसा असेल किंवा 'उद्याचे हवामान' (Tomorrow's Weather) कसे असेल याबातब तुम्ही विचार करता आहात का? तर तुमच्या माहितीसाठी असे की, कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पाठिमागील 24 तासात म्हणजेच शुक्रवावरी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात 30 मिमी पाऊस झाला. शहरात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Rain Updats: 'आजचा पाऊस' (Today's Rain) मुंबईसाठी कसा असेल किंवा 'उद्याचे हवामान' (Tomorrow's Weather) कसे असेल याबातब तुम्ही विचार करता आहात का? तर तुमच्या माहितीसाठी असे की, कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पाठिमागील 24 तासात म्हणजेच शुक्रवावरी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात 30 मिमी पाऊस झाला. शहरात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने शहरासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. काही ठिकाणी पाऊस सामान्य असेल तर काही ठिकाणी पाऊस मुसळधार कोसळेल अशी शक्यता आहे. आयएमडीने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांध्ये पुढचे 3-4 तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, शहरातील किमान तापमान 29 अंश सेल्सिअसवर स्थिरावण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उद्याचे हवामान कसे असेल? याबाबात अद्ययावत माहिती मिळू शकली नाही. मात्र, आयएमडीने आगोदरच इशारा दिला आहे की, पुढचे काही दिवस महत्त्वाचे असतील. या दिवसांमध्ये राज्यात दमदार पाऊस अपेक्षीत आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) मुंबई आणि ठाणेसाठी यलो अलर्ट तर पुणे, पालघर आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने आतापर्यंत वर्तवलेला अंदाज बराच तंतोतंत खरा ठरला आहे. या अंदाजानुसार 24 ते 29 जून दरम्यान नोंदवलेल्या पावसापैकी मुंबईत 95 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे, असा आयएमडीने आपल्या माहितीत दावा केला आहे. उल्लेखनीय असे की, गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार सरी कोसळत असतानाही या महिन्यात शहरात पावसाची एकूणच तूट पाहायला मिळत आहे.(हेही वाचा, Mumbai Rains Update: मुंबई शहर, उपनगरांसह नवी मुंबई, ठाण्यातही संततधार पाऊस; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पाणीच पाणी )
ट्विट
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD… भेट द्यI pic.twitter.com/lIwzqb31FN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 30, 2023
संततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली आहेत. परिणामी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अर्थात पावसाने उघडीप दिली आणि साचलेले पाणी कमी झाले की, वाहतूक पर्ववत होत आहे. मात्र, पावसाचे प्रमाण वाढले की, वाहतूक कोंडीस सुरुवात होताना दिसते.
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2023 02:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

