Sajay Raut Bail: संजय राऊतांना जामीन मिळणार? पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज कोर्टात सुनावणी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार असुन आज त्यांना बेल (Bail) की जेल (Jail) मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter/ANI)

आठवड्याभरापूर्वी पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) ताब्यात घेतलं आहे. तरी न्यायालयाकडून संजय राऊत यांना 8 ऑगस्ट म्हणजे आजपर्यत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. तरी आज संबंधीत प्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार असुन आज त्यांना बेल (Bail) की जेल (Jail) मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा आहे कारण निवडणूक आयोगाकडून 8 ऑगस्टपर्यंत शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी वेळ मिळाला होता. आता आज हे दोन्ही गट निवडणूक आयोगा पूढे काय बाजू मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षाची घटना, गेल्या काही वर्षातल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा इतिहास, त्या त्या पदांची जबाबदारी याचा गोषवारा निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर होणार आहे.

 

आज संजय राऊतांना जामीन मिळाल्यास शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी असु शकते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी फक्त संजय राऊतचं नाही तर त्यांच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी सुरु आहे. तसेच संबंधीत प्रकरणी संजय राऊतांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सध्या संजय राऊत एडीच्या कोठडीत असले तरी कालच त्यांनी सामनाच्या (Saamana) रोखठोक या अग्रलेखातून राज्याटचे राज्यपाल भगतसिंह कोश्याची (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तरी संबंधीत लेखावरुन मनसेसह (MNS) भाजपकडून (BJP) संजय राऊत यांना जेलमधून लिखानाची परवानगी कशी असा सवाल विचारण्यात आला होता. (हे ही वाचा:-Amruta Fadnavis: ..तर देवेंद्र फडणवीसांनी माझा गळा पकडला असं मला वाटतं, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा)

 

तरी कोर्टात संजय राऊतांच्या जामीन प्रकरणी होणाऱ्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जर आज राऊतांना बेल न मिळाल्यास त्यांना पुढील किती दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी पत्राचाळ प्रकरणी फक्त संजय राऊतचं नाही तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडी कडून समन्स बजावण्यात आलं आहे. तसेच संबंधीत प्रकरणावर त्यांची देखील चौकशी सुरु आहे.