ST Bus Service: राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

मात्र, आता एसटी बस सेवेची गरज लक्षात घेऊन राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचं मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून ही एसटी सेवा सुरू करण्यात येईल, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Vijay Namdevrao Wadettiwar | (Photo credit : facebook)

ST Bus Service: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता एसटी बस सेवेची गरज लक्षात घेऊन राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचं मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून ही एसटी सेवा सुरू करण्यात येईल, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवाश्यांना प्रवास करता येणार नाही. एसटी बस सेवेशिवाय राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Balasaheb Patil: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना विषाणूची लागण)

याशिवाय कोविड नियम पाळून राज्यात जिम सुरू करणार असल्याचंदेखील वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. राज्यातील जिम सुरू करण्यात याव्यात, यासाठी मनसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे विनंती केली होती. अखेर जिम सुरू करण्यास सरकारने होकार दर्शवला आहे.

दरम्यान, आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वरारोहण करण्यात आलं. यावेळी वडेट्टीवार यांनी कोरोना काळात उत्तम सेवा देणाऱ्या जिल्हा प्रशासनाची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.