मुळशी धरणात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी गेलेले भारती विद्यापीठातील एमबीए विद्यार्थी

तीन कॉलेज विद्यार्थ्यांचा पुण्याजवळील मुळशी धरणात (Mulshi Dam) बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहलीसाठी हे विद्यार्थी धरणाजवळ आले होते.

Drowning in the Dam (Representational ImaGE/ Photo Credits: PTI)

तीन कॉलेज विद्यार्थ्यांचा पुण्याजवळील मुळशी धरणात (Mulshi Dam) बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहलीसाठी हे विद्यार्थी धरणाजवळ आले होते. त्यावेळी पोहायला उतरलेल्या तीन मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 मुलांसह एका मुलीचा समावेश आहे. हे तीनही विद्यार्थी 22 वर्षे वयोगटातील आहेत. आज, गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुळशी तालुक्यातील वळणे येथील भारती विद्यापीठात शिकणारे हे सर्व विद्यार्थी आहेत. यातील 6 मुले पोहायला धरणात उतरली होती, पैकी 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला. एका मुलीचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या मदतीने मुलांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. संगीता नेगी (मुळ दिल्ली), शुभम राज सिन्हा (वय. 22, मुळ पटना बिहार), शिवकुमार (वय 21, रा. मुळ उत्तरप्रदेश) अशी तिघांची नावे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement