Ahmednagar News: दलित तरुणांचे कपडे काढून झाडाला टांगून मारहाण, अहमदनगर येथील संतापजनक घटना

अहमदनगरमध्ये तीन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ahmednagar News: दलित तरुणांचे कपडे काढून झाडाला टांगून मारहाण, अहमदनगर येथील संतापजनक घटना
Crime | (File image)

Ahmednagar News: अहमदनगर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दलित कुटूंबातील एका मुलाला कपडे काढून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरीच्या संशयितामुळे तरुणाची मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे पीडीत व्यक्तींना कपडे काढून त्याला झाडाला बांधलं. आणि बेदम मारहाण केली. या घटनेनंतर दलित संघटनांनी हरेगाव बंद पाळत घटनेचा निषेध केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात मोलमजुरी करून काम करणाऱ्या तीन तरुणांना लोकांकडून मारहाण केली आहे. शेळी आणि कबुतरं चोरल्याच्या संशयावरून आरोपींनी या तरुणांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे टांगले आहे.  आणि बेदम मारहाण केली. या घटनाची माहिती मिळताच, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतला. त्या पीडीचत तरुणांना नागरिकांनी रुग्णालयात नेलं.

हरेगावात दलित तरुणांना कपडे काढून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळताच, जिल्ह्यातील रिपब्लिकन संघटनांनी तातडीने श्रीरामपुरात धाव घेतली. त्यानंतर एक दिवस हरेगावात बंद पाळण्यात आला. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक होण्याची शक्यता आहे. दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2023 10:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).