Pune: पुण्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लावण्यात आलेला डिजिटल डिस्प्ले अंगावर पडल्याने तीन मुले जखमी, नगरसेवकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी स्क्रिनिंग आयोजित केल्याप्रकरणी स्थानिक नगरसेवक आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

शुक्रवारी रात्री सहकारनगर (Sahakarnagar) परिसरात चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लावण्यात आलेला डिजिटल डिस्प्ले (Digital display) अंगावर पडल्याने तीन मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी स्क्रिनिंग आयोजित केल्याप्रकरणी स्थानिक नगरसेवक आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील (Sahakarnagar Police Station) अधिकाऱ्यांनी सांगितले की, तळजाई येथील स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप यांनी जय भीम चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मोकळ्या प्रांगणात स्क्रीन लावली होती. रात्री 10.15 च्या सुमारास स्क्रीन कोसळल्याने समोर बसलेली तीन मुले जखमी झाली.

प्रांजल विजय आदमाने, अनुष्का विशाल रणदिवे आणि सौरभ जालिंदर पाटोळे अशी जखमी मुलांची नावे आहेत. सहकारनगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेही वाचा  Nagpur Crime: नागपूरात वृद्ध महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या, पोलिसांनकडून आरोपींचा तपास सुरु

त्यापैकी एक गंभीर आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. मात्र ते तसे करण्यास पुढे न आल्याने पोलिसांनीच नगरसेवक व त्याच्या साथीदाराविरुद्ध निष्काळजीपणामुळे जखमी केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे.