Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
त्यामुळे सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सतर्क झाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी हल्ला करुन जीवे मारण्याचा कट (Death Threats) आखला गेल्याचीही गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.
गुप्तचर यंत्रणेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जीवाला आत्मघातकी हल्ल्याचा (Suicide Attack) मोठा धोका आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सतर्क झाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी हल्ला करुन जीवे मारण्याचा कट (Death Threats) आखला गेल्याचीही गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली यंत्रणा सतर्क झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार नक्षलवाद्यांकडून संशयाची सुई नक्षलवाद्यांकडे वळत आहे. दुसऱ्या बाजूला पीएफआय संघटनेचेही नाव या प्रकरणात घेतले जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणत्याही संघटनेचा हात असल्याचे पुढे आले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिनाभरापूर्वीच एक पत्र धडकले होते. या पत्रातही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानतर त्यांच्या कार्यालयात एक निनावी फोनही आला होता. या फोनमध्येही मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता तर त्यांना ठार मारण्याचा कटच पुढे अल्याने त्यांच्या सुक्षेत अधिक वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला झेड दर्जाची सुरक्षा असते. आता त्यातही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Sena Workers Join Shinde Group: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील 4 हजार शिवसेना कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश)
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या धमकीचा संशय जसा नक्षलवाद्यांवर जोडला जात आहे तसाच तो पीएफआय संघटनेशीही जोडला जात आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या कडक धोरणानंतर पीएफआय संघटनेवर नुकतीच बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर संशयाची सुई पीएफआयनेकडेही वळविण्यात येत आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्री कार्यालय, वर्षा निवासस्थान आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ज्या दिवसापासून राज्यात हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार आले आहे तेव्हापासूनच अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे.पण काही झाले तरी राज्य आणि देशाच्या विकासाच्या आड येणारी आणि सुरक्षेला नख लावणारी प्रवृत्ती ठेचून काढली जाईल. या सर्व प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याचाही तपास केला जाईल, असेही दरेकर म्हणाले.