मुंबई: उत्तर प्रदेशला जाण्यासाठी वसईच्या सनसिटी मैदानावर हजारो परप्रांतीय कामगार एकत्र
हे सर्व कामगार रेल्वे गाड्यांची वाट पाहत आहेत. वसई रेल्वे स्थानकातून आज उत्तर प्रदेशसाठी 6 श्रमिक स्पेशल गाड्या सुटणार आहेत. त्यामुळे कामगारांनी याठिकाणी गर्दी केली आहे.
वसईच्या (Vasai) सनसिटी मैदानावर (Suncity Ground) आज हजारो परप्रांतीय कामगार (Workers) आपल्या गावी जाण्यासाठी एकत्र आले आहेत. हे सर्व कामगार रेल्वे गाड्यांची वाट पाहत आहेत. वसई रेल्वे स्थानकातून आज उत्तर प्रदेशसाठी 6 श्रमिक स्पेशल गाड्या (Shramik Special Trains) सुटणार आहेत. त्यामुळे कामगारांनी याठिकाणी गर्दी केली आहे.
प्रशासनाकडून सनसिटी मैदानावर कामगारांसाठी मंडपची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या सर्व कामगारांकडून सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक मजूर देशातील विविध शहरात अडकले आहेत. या मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. आज उत्तर प्रदेशला जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून 6 श्रमिक स्पेशल ट्रेन धावणार आहेत. (वाचा - भारतीय रेल्वे बोर्डातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, रेल भवनातील सर्व ऑफिसे 26-27 मे दिवशी निर्जंतुकीकरणासाठी बंद राहणार)
दरम्यान, 1 मे पासून देशभरात 3026 श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. यामधून आतापर्यंत 40 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्यात आलं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या आहेत. आतापर्यंच गुजरातमधून 853 ट्रेन सोडण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातून आतापर्यंत 527 ट्रेन सोडण्यात आल्या असून यातून 7 लाखाहून अधिक मजूर आपल्या राज्यात परतले आहेत.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील 24 तासांत भारतात 6,535 नवे रुग्ण आढळले असून 146 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,45,380 इतकी झाली आहे. यातील 80722 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 4167 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.