Navratri Festival 2021: याही वर्षी नवरात्रोत्सव साधेपणाने होणार साजरा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना असणार प्रवेशबंदी, शासनाकडून ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध

नवरात्रात भाविकांना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा आणि तुळजापूर (Tuljapur) शहरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल.

Tuljapur Mandir ( Photo Credits: tuljabhavanipujari.com)

महाराष्ट्रात (Maharashtra) सलग दुसऱ्या वर्षी कुलस्वामिनी माता तुळजाभवानीचा (Tuljabhavani) नवरात्रोत्सव (Navratri) भक्तांशिवाय साजरा केला जाणार आहे.   नवरात्रात भाविकांना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा आणि तुळजापूर (Tuljapur) शहरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमांसाठी तुळजा भवानी मंदिरात फक्त 50 लोकांना प्रवेश असेल. पुरोहिताने लसीकरण केले तरच त्याला प्रवेश दिला जाईल. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पुजारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देवीचे महंत, सेवक, पुजारी आणि इतर मान्यवरांनाच नवरात्रोत्सवात प्रवेश मिळेल. कोविडच्या (Covid 19) नियमांनुसार तुळजा भवानी देवीची सर्व पूजा, अलंकार आणि विधी केले जातील.   

उस्मानाबाद जिल्हा नवरात्रात भाविकांसाठी बंद राहील. तुळजापूर शहरातील सर्व प्रवेशद्वार पोलीस संरक्षणात असतील. नवरात्रात अनेक भक्त मशाल घेऊन आणि पायी दर्शनासाठी येतात. मात्र त्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. त्यामुळे भाविकांनी तुळजापूर शहरात येऊ नये आणि ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेता येईल. तुळजापूर शहरात तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून मोठ्या संख्येने भाविक येतात. कोरोना संकटामुळे तुळजापूर बंद असल्याने आता येथीस भाविकांवर बंदी केली आहे. हेही वाचा महाराष्ट्र सरकार कडून महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या कामाच्या तासामध्ये कपात, 12 वरून 8 तासांची ड्युटी; Maharashtra DGP Sanjay Pandey यांची माहिती

नवरात्रोत्सव हा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महत्वाचा असतो. मंदिराचे पुजारी, पोलीस अधीक्षक आणि तुळजापूरचे महापौर यांच्यात बैठक झाली. गेल्या वर्षीही साधेपणाने तुळजा भवानीचे मंदिर शरद ऋतूतील नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला आहे.  नवरात्रीची हजारो वर्षांची परंपरा खंडित होणार नाही. यासाठी 50 पुरोहितांना लसीकरण करण्यात आले आहे का ते पाहण्यात येईल. तरच त्यांना परवानगी मिळेल, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

महापौर सचिन रोचकरी यांनी सांगितले की, नगर परिषद प्रशासन 29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनुसार शहरात स्वच्छता, बॅरिकेडिंग आणि कोरोना फवारणी करणार आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सवा दरम्यान नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.