Mumbai: चोरट्यांनी व्यावसायिकाला त्याच्याच घरात डांबून ठेवून लुटले 55 लाख रुपये; मुंबईतील काळबादेवी परिसरातील घटना

आता दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात (Kalbadevi Area) राहणाऱ्या एका व्यावसायिकाला (Businessman) त्याच्याच घरात डांबून ठेवून लाखो रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Robbery | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Mumbai: देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) हे देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. मात्र असे असूनही येथे गुन्हेगारीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. येथील पोलीस व प्रशासन गुन्हे व गुन्हेगारांना आळा घालण्याचे अनेक दावे करतात. मात्र, प्रत्यक्षात गुन्हेगारीच्या घटना घडतचं राहतात. आता दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात (Kalbadevi Area) राहणाऱ्या एका व्यावसायिकाला (Businessman) त्याच्याच घरात डांबून ठेवून लाखो रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तिजोरीतून 55 लाखांचा ऐवज लंपास -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळबादेवी परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला त्याच्या घरात डांबून ठेवण्यात आले आणि त्यानंतर तिजोरीतून 55 लाख रुपये लुटण्यात आले. काळबादेवी येथील आदित्य हाईट्स येथे हा व्यापारी घरात एकटाच असताना ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा - Farmer Suicide: 'दुष्काळा'त तेरावा महिना! बॅंकेकडून कर्ज फेडण्याची नोटीस येताच शेतकऱ्याने केली आत्महत्या,छत्रपती संभाजी नगर येथील घटना)

प्राप्त माहितीनुसार, व्यावसायिक घरात एकटा असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या चार आरोपींनी प्रथम व्यावसायिकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला डांबून ठेवले. नंतर त्याची तिजोरी साफ केली ज्यामध्ये 55 लाख रुपये होते. (हेही वाचा - Nagpur Shocker: वडिलांनी मोबाईलचा जास्त वापर करण्यास दिला नकार; 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या)

पोलिसांकडून तपास सुरू -

पैसे चोरल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. ही घटना रविवारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व्यावसायिकाच्या जबाबाच्या आधारे एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. या संदर्भात, एलटी मार्ग पोलिसांनी भादंवि कलम 454, 392, 341 आणि 34 अन्वये अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif