महाराष्ट्र: लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आवश्यक सेवा पुरविण्यासाठी सरकारने केली मुंबई, पालघर, रत्नागिरीसह 'या' जिल्ह्यांत विभागीय नोडल अधिका-यांची नेमणूक, येथे पाहा संपूर्ण यादी
त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या महा इन्फो सेंटर या ट्विटर अकाउंटवर ही यादी जाहीर केली आहे
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमिवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. अशावेळी नागरिकांना आवश्यक वस्तूंसाठी वणवण करावी लागू नये यासाठी राज्य सरकारने विभागीय नोडल अधिका-यांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर रोजंदारीवर काम करणा-यांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या या अधिका-यांकडून अशा गरजूंना अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.
राज्यातील मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबई उपनगरांत नोडल अधिकारी नेमले आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या महा इन्फो सेंटर या ट्विटर अकाउंटवर ही यादी जाहीर केली आहे. Coronavirus Outbreak: महाराष्ट्रात 55 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 690 वर पोहचली
पाहा संपूर्ण यादी:
महाराष्ट्रात (Maharashtra) 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 690 वर पोहचली आहे. आज मुंबईत 29, पुण्यात 17, पिंपरी-चिंचवड 4, अहमदनगर 3, औरंगाबादमध्ये 2 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच आतापर्यंत 56 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.