Mumbai-Bengaluru Flight Delays Due To Hoax Call: 'प्लाइटमध्ये बॉम्ब आहे'; फसव्या कॉलमुळे मुंबई ते बेंगळुरू विमानाला 7 तास उशीर
त्यामुळे मुंबई ते बेंगळुरू प्लाइटला सुमारे सात तास उशीर झाला.
Mumbai-Bengaluru Flight Delays Due To Hoax Call: फसव्या कॉलमुळे (Hoax Call) मुंबई ते बेंगळुरू विमानाला (Mumbai-Bengaluru Flight) 7 तास उशीर उशीर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॉलरने आकासा एअरलाइनच्या कॉल सेंटरवर फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल केला. त्यामुळे मुंबई ते बेंगळुरू प्लाइटला सुमारे सात तास उशीर झाला. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी मालाड येथील आकासा एअरच्या कॉल सेंटरला सायंकाळी 6.36 वाजता फोन आला. कॉलर म्हणाला, 'संध्याकाळी 6.40 च्या मुंबई ते बेंगळुरू फ्लाइटमध्ये बॉम्ब आहे.'
कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी हा संदेश तात्काळ आकासा एअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी या फ्लाइटमधून 167 प्रवाशांसह छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणाची तयारी करत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना समजले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ फ्लाइट कॅप्टनला कॉल सेंटरवर आलेल्या कॉलबद्दल माहिती दिली. (हेही वाचा -Cockroaches Found In Food Area of Flight: इंडिगो फ्लाइटच्या फूड एरियामध्ये प्रवाशाला आढळली झुरळं; विमान कंपनीने दिली 'अशी' प्रतिक्रिया)
दरम्यान, कॅप्टनने एटीसी टॉवरला यासंदर्भात माहिती दिली आणि पुढील सूचना मिळेपर्यंत फ्लाइट थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, विमान वेगळे करण्यात आले. विमानाच्या आत चिंताग्रस्त झालेल्या प्रवाशांना काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले आणि त्यांचे सामानही उतरवण्यात आले. (हेही वाचा -Turbulence on IndiGo's Delhi-Srinagar flight Viral Video: खराब वातावरणामुळे इंडिगो च्या विमानाला आकाशात जोरदार झटके; प्रवाशांसाठी ठरला खतरनाक अनुभव (Watch Video))
बॉम्ब शोधक व निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली, मात्र अनुचित प्रकार आढळून आला नाही. शेवटी, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.30 वाजता, निर्गमनाच्या नियोजित वेळेनंतर सात तासांनी विमानाने बेंगळुरूसाठी उड्डाण केले. आकासा एअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. अनोळखी व्यक्तीविरुद्ध सार्वजनिक उपद्रव व धमकावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.