पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील; मात्र, ते निष्ठावंत असले पाहिजेत- नितीन गडकरी
गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेल्या नेत्यांनी आपला पक्ष सोडून विरोधी पक्षाला पक्षात प्रवेश केला होता. सध्या कोणता नेता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात उडी घेईल, हे सांगता येत नाही. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर (Nagpur) येथील एका कार्यक्रमात आपले मत मांडले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याअगोदर राजकारणात बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेल्या नेत्यांनी आपला पक्ष सोडून विरोधी पक्षात प्रवेश केला होता. सध्या कोणता नेता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात उडी घेईल, हे सांगता येत नाही. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर (Nagpur) येथील एका कार्यक्रमात आपले मत मांडले आहे. पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालेल. मात्र, ते निष्ठावंत असले पाहिजे असे नितीन गडकरी म्हणाले. भाजपचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते.
भाजपचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा सत्कार समारंभ नुकताच नागपूर येथे पार पडला आहे. दरमयान, भाजप नेते नितीन गडकरी यांनी निष्ठेच्या पलीकडे राहून पक्षात काम करतात, अशा नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, नागपूर जिल्ह्यात सुरुवातीची पार्टी पूर्ण संपली होती. मात्र आनंदरावसारख्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्ते जोडले आणि आज सागर उभा केला. आता पार्टीत असलेले अनेक जण वेगवेगळ्या पार्टीत होते. त्यांना पार्टीत आणण्याचे काम त्यांनी केले. भाजपची स्थापना झाली त्यानंतर चांगले दिवस आले. पार्टी चालत्या गाडीप्रमाणे आहे. या पार्टीत पारिवारिक वातावरण आहे. ही पार्टी कोण्याएकाची नाही, कुठल्याही जाती पातीचा पक्षात विचार केला जात नाही. हा पक्ष सगळ्यांचा आहे. जुने निष्ठावान कार्यकर्ते जेव्हा आपल्यात नसतात तेव्हा दुःख होते. मात्र पार्टीत सूज आणणारे कार्यकर्ते नको”, असेही त्यांनी नितीन गडकरी त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने 'एनआयए'कडे सोपावला. हे देखील वाचा- नागरिक दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या व्याख्यानाला विरोध; कॉंग्रेस पक्षाकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अधिका जागा मिळाल्या तरी देखील पक्षाला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. यावरूनही नितीन गडकरी यांनी आपली बाजू मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या. त्यामुळे सेना भाजपला बहुमत होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असे कुणी म्हणत असेल तर मला मान्य नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत.