Param Bir Singh's Letter प्रकरणावर NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले
मात्र या सर्वावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असा उल्लेख केल्यानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परमबीर सिंह यांच्या या पत्रामुळे मोठा स्फोट झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष गृहमंत्र्यांवर जोरदार टिका करत असून त्याचाच एक भाग म्हणून आज राज्यात अनेक ठिकाणी अनिल देशमुखांविरोधात (Anil Deshmukh) भाजप नेत्यांकडून आंदोलन केली जात आहे. मात्र या सर्वावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले त्यानंतर परमबीर सिंह यांची पत्रातून आलेली प्रतिक्रिया आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही" अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना दिली.हेदेखील वाचा- परम बीर सिंग यांच्या पत्रात स्वाक्षरी नाही; प्राप्त झालेल्या इमेल पत्राबाबत शहानिशा होणार- Chief Minister's Office
दरम्यान या प्रकरणी शरद पवार दिल्लीत आज सायंकाळी 7 वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
काय होते प्रकरण?
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे आरोप केले आहेत. तसंच मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते.