'जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले, त्यांना दुसऱ्या पक्षात किंमत नाही' अजित पवार यांच्याकडून उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका
या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडून भाजप-शिवसेना (Bhartiya Janta -Shiv Sena) पक्षात प्रवेश केलेल्या लोकांवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडूक 2019 च्या (Maharashtra Assembly Election 2019) पार्श्वभूमीवर (Satara) जिल्ह्यातल्या पिंपोडे गावात शनिवारी राष्ट्रवादी पक्षाची (National Congress Party) प्रचार सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडून भाजप-शिवसेना (Bhartiya Janta -Shiv Sena) पक्षात प्रवेश केलेल्या लोकांवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे अजित पवार यांनी या सभेत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या नेत्यांना राष्ट्रवादीत असताना जो मान सन्मान मिळायचा, अशा लोकांना दुसऱ्या पक्षात किंमत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी उदयनराजे यांचे नाव घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला होता. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले की, "मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नाही. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. जे पक्ष सोडून गेले त्यांना तिथे किंमत नाही. पवार साहेब सभेवेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान द्यायचे", अशा शब्दात अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडून गेलेल्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा आश्चर्यचकीत करणारा इतिहास तुम्हाला माहीत आहेत का? घ्या जाणून
अजित पवार यांचे ट्विट-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती विजय मिळवला होता. त्याचबरोबर पुढील विधानसभा निवडणूक कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.