महाराष्ट्र राज्यात तब्बल 1 लाख 91 हजार सरकारी नोकऱ्या; पदे भरण्यास सरकारची टाळाटाळ

महाराष्ट्रातही याहून काही वेगळी परिथिती नाही. मात्र आर्थिक पाहणी अहवालात राज्यात तब्बल 1 लाख 91 हजार सरकारी पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

देशातील बेरोजगारी दर कमालीचा वाढत आहे, ग्रामीण भागात तर याबाबत भयानक चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातही याहून काही वेगळी परिथिती नाही. मात्र आर्थिक पाहणी अहवालात राज्यात तब्बल 1 लाख 91 हजार सरकारी पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. ही पदे भरण्यासाठी शासन कोणतीही पावले उचलत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात जास्त रिक्त पदे ही आरोग्य खात्यात आहेत. आरोग्य खात्यात तब्बल 50 टक्के पदे रिक्त आहेत.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये 2018-19 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला गेला.  सरकारी सेवेतील ‘क’ वर्गात सर्वात जास्त म्हणजेच 1 लाख 5 हजार पदे रिक्त आहेत. याआधी ‘क’ वर्गातील 76 हजार पदे भरण्याचे राज्य शासनाने घोषीत केले होते, मात्र या घोषणेनंतर काहीच घडले नाही. 1 जुलै 2018 रोजी राज्य शासनाच्या सेवेतील गट अ ते ड वर्गातील 7 लाख 17 हजार पदे मंजूर आहेत. यामध्ये तब्बल 2 लाख पदे अजूनही रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. मात्र तरी सरकार ही पदे भरण्यास का उदासीन आहे? असी विचारणा केली जात आहे.

(हेही वाचा: बँकिंग क्षेत्रात तब्बल 7 हजार पेक्षा जास्त पदांची भरती; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि कुठे कराल अर्ज)

दरम्यान, अधिवेशांच्या पहिल्याच दिवशी मागील वर्षातील दुष्काळामुळे कृषी क्षेत्रात 8 टक्के घट अपेक्षित आहे. एकीकडे शेतकरी योग्य भावासाठी झगडतोय तर दुसरीकडे नोकऱ्या असून त्या देण्याची सरकारला इच्छा नाही असे दिसत आहे.