Pune: पॉर्नसाईटवरील व्हिडिओ पाठवून मित्राच्याच संसारात पेरले विष; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल

मित्राला पॉर्नसाईटवरील व्हिडिओ तुझाच पत्नीचा आहे असे सांगून त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सवरून पाठवला. त्यानंतर पतीने छळ करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Pune: पॉर्नसाईटवरील व्हिडिओ पाठवून मित्राच्याच संसारात पेरले विष; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल

मित्राला पॉर्नसाईटवरील व्हिडिओ तुझाच पत्नीचा आहे असे सांगून त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सवरून पाठवला. त्यानंतर पतीने छळ करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर महिलेचा पती आणि त्याचामित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला तिचा पती वारंवार चारित्र्याचा संशय घेऊन त्रास देत होता. याच त्रासाला वैतागून पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

पीडित महिला ही पिंपरी येथील वाकड परिसरातील राहिवाशी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या पतीच्या मित्राला त्याला एक पॉर्नसाईटवरील व्हिडिओ पाठवला होता. तसेच हा व्हिडिओ तुझ्याच पत्नीचा आहे, असेही सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. दरम्यान, तिचा पती वारंवार चारित्र्याचा संशय घेऊन त्रास देत होता. या त्रासाला वैतागून पीडित महिलेने जवळच्या पोलिसांत धाव घेवून हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाकड पोलीस ठाण्यातील फौजदार संगीता गोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वृत्तात दिली आहे.

हे देखील वाचा-Nashik Murder: धक्कादायक! नाशिक येथील इंदिरानगर येथे गॅरेज कामगाराकडून मालकाची हत्या; 2 जणांना अटक. पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या तसेच गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर बिहारच्या दिशेने वाटचाल करते की काय? अशी भिती अनेकांच्या मनात येऊ लागली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2020 09:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).