परभणी: मुंबईहून जितुंर तालुक्यातील शेवडी या मुळगावी परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण
आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले आहे. या तीन जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने परभणी जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईहून (Mumbai) जितुंर (Jintur) तालुक्यातील शेवडी (Shevdi) या मुळगावी परतलेल्या तिघांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले आहे. या तीन जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने परभणी (Parbhani) जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेवडी येथील रहिवाशी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये गार्ड म्हणून कार्यरत होता. तो जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचा रहिवासी आहे. मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे तो आपल्या परिवाराला घेऊन गावाकडे निघाला. (हेही वाचा - Coronavirus Lockdown: मुंबईत काम करणाऱ्या 5 जणांचा ऑटोरिक्षाच्या माध्यमातून बिहारकडे प्रवास)
दरम्यान, जिंतूरला आल्यानंतर त्याने आपली आणि पत्नी आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली होती. या कुटुंबाचा रिपोर्ट येईपर्यंत सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्याची पत्नी आणि दोन मुलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. परभणीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या कोरोना चाचणी केली जाणार आहे.