Maharashtra Budget Session 2021: महिलांसंदर्भातील आरोप करताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी संयम ठेवायला पाहिजे - अजित पवार
गुरुवारी औरंगाबाद शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णाकडून शरीर सुखाची मागणी करत बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी आज विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दरम्यान, अजित पवार यांनी अधिवेशनात संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती दिली.
Maharashtra Budget Session 2021: महिलांसंदर्भातील वृत्तांबाबत चर्चा करताना, आरोप करताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी संयम ठेवायला पाहिजे आहे. प्रकरणातील तथ्य तपासणी करुणचं अशा प्रकरणांबाबत अधिक बोलायला हवे. कोणत्याही महिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. आपल्या सर्वांचीचं ती भावना आहे. त्याबाबत दुमत नाही. पण प्रतिक्रिया देताना, आरोप करताना संयम ठेवायला पाहिजे आणि जबाबदारीने बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधीमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनात मांडलं आहे.
दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णाकडून शरीर सुखाची मागणी करत बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी आज विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दरम्यान, अजित पवार यांनी अधिवेशनात संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचेदेखील अजित पवार यांनी सांगितले. (वाचा - Maharashtra Budget Session 2021: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण, जळगावमधील 'त्या' वसतीगृहात 'तो' प्रकार घडला नाही)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशन सुरू होण्याअगोदर औरंगाबाद मधीलन घटनेच उल्लेख करत ही घटना गंभीर असून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी विधानसभेत महिलांसंदर्भातील प्रकरणावर सर्वांनीचं जबाबदारीने बोलले पाहिजे, असं आवाहन केलं.
औरंगाबादमध्ये एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर डॉक्टरांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गंभीर आहे, याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु महिलेवर बलात्कार झालेला नाही. प्राथमिक चौकशी करून त्या डॉक्टरला बडतर्फ केले आहे. तरीही वरिष्ठांकडून याची सखोल चौकशी केली जाईल. संबंधित डॉक्टर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही यावेळी अजित पवार यांनी दिलं.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2021 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

