Sanjay Raut on The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाबाबत जे राजकारण होत आहे ते योग्य नाही - संजय राऊत

द काश्मीर फाइल्स चित्रपट कसा बनवला गेला, तो का बनवला गेला आणि या चित्रपटाचा अजेंडा काय आहे हे सर्वांना माहीत आहे. काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत जे राजकारण होत आहे ते योग्य नाही.'

Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

Sanjay Raut on The Kashmir Files: चित्रपट दिग्दर्शक (Film Director) विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसह राजकारणीही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. काश्मीर फाइल्स करमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात उठलेल्या आवाजावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीर फाइल्स महाराष्ट्रात करमुक्त करण्यास नकार देताना राऊत म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट बनवला तेव्हा तो करमुक्त केला नाही, तरीही लोक तो पाहायला आले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'काश्मिरी पंडित शिवसेनेला ओळखतात. द काश्मीर फाइल्स चित्रपट कसा बनवला गेला, तो का बनवला गेला आणि या चित्रपटाचा अजेंडा काय आहे हे सर्वांना माहीत आहे. काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत जे राजकारण होत आहे ते योग्य नाही.'(हेही वाचा -The Kashmir Files च्या नावाने WhatsApp वर चालू आहे फसवणूक; चुकूनही क्लिक करू नका 'अशा' लिंकवर, पोलिसांकडून अलर्ट जारी)

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, 'द कश्मीर फाईल्स चित्रपट सोडा, बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही चित्रपट बनवला तेव्हा तो करमुक्त केला नाही, तरीही लोक तो पाहायला आले. बाळासाहेब ठाकरे यांनीही काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीमध्ये महाराष्ट्रात कोटा ठेवला होता.

या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांच्या वेदना मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. काश्मिरी पंडितांच्या पलायनाची कहाणी दाखवणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.