मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात; समर्थकांची प्रचंड गर्दी

या मोर्चात स्वत: राज ठाकरे हिंदू जिमखाना ते मेट्रो सिनेमापर्यंत मनसे कार्यकर्त्यांसोबत पायी चालणार असल्याची माहिती समोर आली होती.

मनसे (Photo credit: IANS)

पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चात स्वत: राज ठाकरे हिंदू जिमखाना ते मेट्रो सिनेमापर्यंत मनसे कार्यकर्त्यांसोबत पायी चालणार असल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्यासह आपल्या धारेतही बदल केला आहे. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचे त्यावेळी त्यांनी स्पष्ट झाले. तेव्हापासून राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. मनसेच्या महामोर्चाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच 23 जानेवारी रोजी पक्षाच्या झेंड्यासह आपल्या विचारधारेतही मोठा बदल केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात आवाज उठवला आहे. या पाश्वभूमीवर मनसेचा आज 9 मार्च रोजी मोर्चा निघाला आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेना पत्रके वाटण्यात आले होते. तसेच मुंबईतल्या नाक्यानाक्यावर मनसेचे पोस्टर लावण्यात आले होते. मनसे मोर्चासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी-शर्ट छापण्यात आले आहेत. पदधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बॅंडही तयार करण्यात आले आहे. आजचा मोर्चा आकर्षित ठरणार आहे. मनसेच्या मोर्चाला सुरुवात झाली असून मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे कल्याण, पुण्यासह राज्यभरातील प्रमुख राज्यातून मनसैनिकांनी उपस्थिती दाखवली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदू जिमखान्यावर दाखल झाल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर राज ठाकरेंसह महत्त्वाचे नेते महापालिका मार्गावरून आझाद मैदानात प्रवेश करतील, तर मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावर असलेल्या 3 गेटमधून मैदानात जातील. हे देखील वाचा- मनसेच्या महामोर्चाला मनसैनिकांची प्रचंड गर्दी, दक्षिण मुंबईत सर्वत्र भगवे वातावरण; 9 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मनसे ट्वीट-

मोर्चा निघण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. मनसेने भूमिका बदलल्याच्या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "मनसेने कधीही हिंदुत्व सोडले नाही. गेली तेरा वर्ष मनसेने हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. रझा अकादमीच्या विरोधात मनसेनेच आंदोलन केले होते," असे त्या म्हणाल्या होत्या.



संबंधित बातम्या