Building Collapses in Dombivli: रात्रभर वेब सीरीज पाहण्याच्या एका तरूणाच्या सवयीमुळे वाचले तब्बल 75 जणांचे प्राण
डोंबिवली (Dombivli) पश्चिमेतील कोपर गावामध्ये (Kopar Village) 42 वर्षीय जुनी अतिधोकादायक इमारत गुरुवारी पहाटे अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
डोंबिवली (Dombivli) पश्चिमेतील कोपर गावामध्ये (Kopar Village) 42 वर्षीय जुनी अतिधोकादायक इमारत गुरुवारी पहाटे अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या इमारतीत तब्बल 18 कुटूंब राहत असून एका 18 वर्षीय तरुणाच्या रात्रभर वेब सीरीज पाहण्याच्या सवयीमुळे सर्वांचे प्राण वाचले आहेत. कुणाल मोहिते (Kunal Mohite) असे त्या तरुणाचे नाव आहे. इमारत कोसळण्यापूर्वी कुणाल याला एक आवाज ऐकू आला होता. हा आवाज ऐकून घराबाहेर आलेल्या कुणालने आरडा-ओरडा करत सर्व रहिवाशांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. रहिवासी बाहेर पडले आणि काही वेळातच इमारतीची एक बाजू पूर्णपणे कोसळली. कुणालच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तो नेहमी रात्री 2 वाजता वेब सीरिज पाहून झोपायचा. मात्र, घटनेच्या रात्री त्याला झोप येत नसल्याने तो पहाटे 4 वाजेपर्यंत जागा होता. तसेच आपल्या मोबाईलमध्ये वेब सीरिज पाहत होता. त्यावेळी अचानक त्यांच्या स्वयंपाक घराचा काही भाग कोसळला. त्यानंतर त्याने तातडीने घरातील सदस्यांना सांगितले. तसेच इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही त्याने सावध केले. कुणालचे ऐकून इमारतीतील सर्व लोक बाहेर आली. त्यानंतर केवळ 5 मिंनटात ही इमारत कोसळली. हे देखील वाचा- Face Mask Fine in Maharashtra: मुंबई महापालिका कार्मचाऱ्यांवर गर्दुल्याकडून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न
एएनआयचे ट्विट-
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत 9 महिन्यांपूर्वीच धोकादायक म्हणून घोषीत करण्यात आली आहे. तसेच या इमारतीच्या रहिवाश्यांनना घर खाली करण्यासाठी सांगितले होते. नोटीस मिळाली आहे, परंतु, या इमारतीत राहणारे सर्व रहिवाशी गरिब आहेत. लॉकडाऊनच्या काळात इमारत सोडून कुठे जाणार? असा प्रश्नही रहिवाश्यांनी उपस्थित केला आहे.