औरंगाबाद येथे सुरु झाले देशातील पहिले Food ATM; पैसे टाकून तब्बल 48 पदार्थ विकत घेण्याची सोय
भारतातील पहिले फूड एटीएम (Food ATM) औरंगाबाद येथे सुरु झाले आहे. या एटीएम ची खासियत म्हणजे पैसे टाकून तब्बल 48 पदार्थ तुम्ही या एटीएममधून मिळवू शकता. वाळूज एमआयडीसीतील तरूण उद्योजक प्रतिक पाटील यांनी ही योजना साकारली आहे.
आजकाल आपल्याला एटीएमची इतकी सवय झाली आहे की, कधी कधी एटीएम मध्ये पैसे नसतील तर चीडचीड होते. सध्या भारतात जवळजवळ सर्व ठिकाणी एटीएम पोहचले आहे. याच धर्तीवर आता भारतातील पहिले फूड एटीएम (Food ATM) औरंगाबाद (Aurangabad) येथे सुरु झाले आहे. या एटीएम ची खासियत म्हणजे पैसे टाकून तब्बल 48 पदार्थ तुम्ही या एटीएममधून मिळवू शकता. वाळूज एमआयडीसीतील तरूण उद्योजक प्रतिक पाटील यांनी ही योजना साकारली आहे.
एमआयडीसीमधील प्रतिक यांच्या लेसोकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लिमीटेड कंपनी मध्ये हे एटीएम बसवण्यात आले आहे. या प्रयोगाद्वारे ते स्वतः रिटेल फूड व्यवसायात उतरत आहेत. याच्या पुढची पायरी म्हणून, औरंगाबादच्या बसस्टँड, रेल्वेस्टेशनवर 3 महिन्यात मणुष्यविरहित ‘लेसोकार्ट फूड पाईंट’ सुरू होणार आहेत. सध्या फूड एटीएमचा व्यवसाय करण्याऱ्या सेगा आणि इन्स्टा गो अशा परदेशी कंपन्या आहेत. भारतात काही ठिकाणी या कंपन्यांची मशीन वापरली जाते. मात्र लेसोकार्टमधील फूड व्हेडिंग मशीन देशातील पहिली भारतीय बनावटीची मशीन ठरली आहे. (हेही वाचा: नेहमी बाहेरचे खाणे? फूड पॉयझनिंग झाल्यास हे करा उपाय व अशी घ्या काळजी
या मशीनची किंमत फक्त दीड लाख रुपये इतकी आहे. या मशीनद्वारे अवघ्या 5 बाय 5 फुट जागेत तुम्ही तुमचा व्यवसाय करू करू शकता. या मशीन मध्ये 48 प्रकारे प्रॉडक्ट ठवता येतात, यामध्ये बिस्कीट, चॉकलेट्स, केक, व्हेफर्स आदींचाही समावेश आहे. आदीचा समावेश आहे. नोटा, कार्ड, पेटीएम किंवा अन्य मोबाईल व्हॅलेटद्वारे तुम्ही हे पदार्थ विकत घेऊ शकता. दरम्यान, गेली दोन वर्षे प्रतिक पाटील या मशीनसाठी काम करत होते. तीन देशांमधून या मशीनचे पार्टस मागवण्यात आले आहेत. त्यांचे एकत्रीकरण भारतात घडले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2019 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

