Mumbai: धक्कादायक! वरळी सी फेसमध्ये गोणीमध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

त्यानंतर त्यांनी वरळी पोलिसांना माहिती दिली. वरळी येथे असलेल्या भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र बॅटरी बेस INS Trata च्या मागे, समुद्रातील खडकावर पिशवी अडकलेली आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पिशवी किनाऱ्यावर आणली. यात महिलेचा मृतदेह दोरीने बांधलेला आढळून आला.

Representational image (Photo Credit- IANS)

Mumbai: वरळी सी फेस (Worli Sea Face) येथे मंगळवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह गोणीत सापडला. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राच्या भरतीमुळे हा मृतदेह तटरक्षक दलाच्या (Coast Guard Office) कार्यालयाजवळील नाल्यात तरंगला असावा आणि तो किमान पाच दिवस जुना असावा. समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे या महिलेचा मृतदेह पूर्णपणे खराब झाला होता.

मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत ही बाब प्रथम मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. त्यानंतर त्यांनी वरळी पोलिसांना माहिती दिली. वरळी येथे असलेल्या भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र बॅटरी बेस INS Trata च्या मागे, समुद्रातील खडकावर पिशवी अडकलेली आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पिशवी किनाऱ्यावर आणली. यात महिलेचा मृतदेह दोरीने बांधलेला आढळून आला. मृतदेहाची गोणीत विल्हेवाट लावण्यापूर्वी आणि समुद्रात टाकण्यापूर्वी तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - Navi Mumbai: धक्कादायक! मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय महिलेची आत्महत्या)

पीडित महिलेचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिलेचा चेहरा एवढा खराब झाला आहे की तो ओळखण्याची शक्यता नाही, आम्ही फॉरेन्सिकची मदत घेणार आहोत. तोपर्यंत, पीडितेच्या संशयित वयोगटातील महिला बेपत्ता होण्याच्या अलीकडील प्रकरणांची तपासणी करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे, असं वरळी पोलिसातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 10 हून अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. कोस्टल गार्ड्सना देखील तपासात मदत करण्यास सांगितले आहे. भारतीय दंड संहितेच्या (कलम 302) हत्येच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. सततच्या पावसामुळे आणि भरतीच्या लाटांमुळे शरीराला गंभीर इजा झाली असल्याने, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण आणि वेळ निश्चित होईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif