Pune Crime News: क्षुल्लक कारणांवरून वाद, सूनेने केला सासूवर चाकू हल्ला, येरवाडा परिसरात खळबळ
पुणे शहरातील येरवाडा परिसर एक धक्कादायक घटनेमुळे हादरले आहे. क्षुल्लक वादामुळे सूनेने सासाच्या हातावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Pune Crime News: पुणे शहरातील येरवाडा परिसर एक धक्कादायक घटनेमुळे हादरले आहे. क्षुल्लक वादामुळे सूनेने सासाच्या हातावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील येरवाडा परिसरात घडली आहे. सासूने सुनेला नकटी बोलल्याने दोघींमध्ये मोठा वाद झाला. या गोष्टीचा राग मनात धरत सूनेने चाकू घेऊन सासूवर वार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्री ही घटना घडली. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांच्या सुरक्षेतवर प्रश्न निर्माण होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवाडा परिसरातील पोलिस ठाण्यात सासूने या घटनेअंतर्गत फिर्याद नोंदवली आहे. संध्या अशोक मगर असं आरोपी सुनेचे नाव आहे.संध्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालनबाई परशुराम मगर असं पीडित सासूचे नाव आहे.संध्याकाळी स्वंयपाक बनवत असतना सासू आणि सुनेमध्ये वाद झाला. संध्या सासूला नकटी असे म्हणाली. त्यानंतर सासू मालनबाई ‘तूसुद्धा नकटी आहे’, असे तिला म्हणाल्या. या कारणाचा राग म्हणात धरत तीनं सासूवर चाकूने वार केला.
या घटनेत मालनबाई जखमी झाल्या. या घटनेची माहिती येरवाडा पोलिस ठाण्यात देण्यात आली. सासूने दिलेल्या तक्रारीत सुनेवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालनबाई यांच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार सुरु झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2023 07:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

