लोककलावंत छगनराव चौगुले यांचे योगदान सदैव स्मरणात राहील- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईतील (Mumbai) सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

लोककलेला नवा साज चढवून मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे लोककलावंत छगन चौघुले (Chhaganrao Chowgule)यांचे आज निधन झाले. मुंबईतील (Mumbai) सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही छगन चौगुले यांच्या निधानाबद्दल दुख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील लोकगीते, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारासाठी छगनरावांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. छगनरावांनी सांगितलेल्या देवदेवतांच्या कथा, गायलेली कुलदेवतांची गाणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून त्यांनी लोककलांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी घडवले. जागरण गोंधळासारखी लोककला विद्यार्थ्यांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत यशस्वीपणपे पोहोचवली. छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला जगताची, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. छगन चौगुले यांच्या ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा: कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ या ध्वनिमुद्रिका विशेष गाजल्या आहेत. पण ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ या गाण्याने त्यांना अधिक लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांचे हे गाणे आजही अनेक हळदी समारंभात किंवा कॉलेजमधील कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळते. लोककलेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील श्रोत्यांची मने जिंकणारा कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला सूचक इशारा; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या आढावा बैठकीस मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती

ट्वीट-

व्हिडिओ- 

 

 

एकेकाळी गायक आणि संगितकारांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केलेल्या ध्वनिमुद्रिका काढल्या जात आहेत. या ध्वनिमुद्रिकांनी महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना ओळख मिळवून दिली. यात सुरुवातीला विठ्ठल उमप, शाहीर साबळे, शाहीर प्रल्हाद शिंदे याचा समावेश होता. पुढे याच यादीत आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि छगन चौगुले यांचा समावेश झाला. छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif