Karnataka CM Basavaraj Bommai to visit Belgaum: सीमाप्रश्न चिघळणार! कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आज बेळगावी देणार भेट

बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर आपला हक्क सांगितला, त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) म्हणाले की, आमचे सरकार महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही.

Karnataka Chief Minister Basavaraj Bommai (Photo Credit: PTI)

Karnataka-Maharashtra Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाच्या (Karnataka-Maharashtra) ठिणगीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) शुक्रवारी बेळगावला भेट देणार आहेत. हा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती भाग आहे, ज्यावर दोन्ही राज्ये स्वतःचा दावा करतात. बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर आपला हक्क सांगितला, त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) म्हणाले की, आमचे सरकार महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. बोम्मई यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, माझे सरकार कर्नाटकच्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे आणि त्यांनी तसे केले आहे.

बोम्मई यांनी केला मोठा दावा

बोम्मई यांनी दावा केला आहे की, जलसंकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात विलीनीकरणाची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. याशिवाय महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत त्या शाळांचा विकास कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणामार्फत निधी दिला जाणार आहे. तथापि, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाव्यांचे खंडन केले आणि सांगितले की अशा कोणत्याही गावाने अलीकडच्या काळात कर्नाटकात विलीन होण्याची मागणी केलेली नाही. (हे देखील वाचा: Karnataka-Maharashtra Dispute: कर्नाटक-महाराष्ट्र सिमावादावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीला रवाना)

महाराष्ट्रातील राजकारणावर केली टीका 

दरम्यान, बोम्मई यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर टीका केली आहे. सीमावाद हे महाराष्ट्रात राजकीय हत्यार बनले आहे आणि सत्तेत असलेला कोणताही पक्ष राजकीय हेतूने हा मुद्दा उपस्थित करत राहतो. परंतु, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही आणि भविष्यातही मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.