Navneet Rana: खासदार नवनीत यांना कोर्टाचा दणका; दोषमुक्ती नाहीच, वॉरंटही कायम

नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांनी न्यायालयाकडे दोषमुक्तीसाठी अर्ज (Navneet Rana Caste Certificate) केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Navneet Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांचा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून जोरदार झटका मिळाला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांनी न्यायालयाकडे दोषमुक्तीसाठी अर्ज (Navneet Rana Caste Certificate) केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे राणा यांना दोषमुक्ती तर मिळालीच नाही. पण शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शिवाय शिवडी कोर्टाने बजावलेलेल अजामीनपात्र वॉरंटही योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

नवनीत राणा यांनी सुरुवातीला शिवडी न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज केला होता. शिवडी न्यायालयाने त्याच वेळी राणा बापलेकीचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर या बापलेकीने मुंबई हायकोर्टाकडे अर्ज केला परंतू, तिथेही न्यायालयाने दिलासा दिला नाही. हे प्रकरण जुने आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांच्या विरोधात जात प्रमाणपत्राप्रकरणी सन 2014 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याशी संबंधीत असे हे प्रकरण आहे. (हेही वाचा, Navneet Rana: गणपती विसर्जना दरम्यानचा राणा दामपत्याचा व्हिडीओ व्हायरल, चुकीच्या पध्दतीने विसर्जन केल्याने नवनीत राणासह रवी राणा ट्रोल)

नवनीत राणा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला मिळवला आहे. तसेच, त्यांच्या वडीलांनी फसवणूक करुन जात प्रमाणपत्र प्राप्त केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ झाले आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांवर असलेल्या आरोपांमध्ये त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.