Latur Crime: कुमठा गावात सापडला मुलाचा मृतदेह, तासाभरात उकलले गुढ, आरोपीला अटक

लातूर जिल्ह्यातील एका १५ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Latur Crime: लातूर (Latur) जिल्ह्यातील एका 15 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमठा खु, शिवारात मोबाईल चोरीच्या संशयावरून मुलाची हत्या केली. आरोपीने मयत मुलाची निर्घृणतेने हत्या केल्या, ज्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गोंविद घुगे  (वय वर्ष 15) कुमठा येथील रहिवाशी असं मयत मुलाचे नाव आहे. गावात एका सरकारी शाळेत नववीचे शिक्षण घेत होता. (हेही वाचा- लातूरमध्ये दोन सख्खा चुलत भावांची हत्या, पूर्व वैमनस्यातून केल्याचा संशय,)

मिळालेल्या माहितीनुसार,मुलाचे मृतदेह गावातील रस्त्याच्या आत एक शेतात सापडला. एक मेंढपाठ आपल्या मेंढ्या चारत होता, त्यावेळी एक मृतदेह आढळून आलं या घटनेची माहिती पोलिसांना आणि गावकऱ्यांना देण्यात आली. बेवारस मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.  गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी मृताची ओळख व्हावी या करिता, गावकऱ्यांशी चौकशी केली. ही हत्या चार दिवसांपूर्वी केल्याची पोलिसांच्या लक्षात आले.

घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अगदीच काही कालावधीत आरोपीचा शोध लावला. त्याला अटक करत त्याची चौकशी केली, तर मोबाईलच्या चोरीच्या संशयावरून ही हत्या केल्याचे समोर आले. मृतदेह हे भयावह अवस्थेत सापडले होते.  आरोपीने मयत मुलाचे पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकले. ज्ञानोबा देवनाळे (वय 28 वर्ष, रा. पिंपरी ता. उदगीर) असे आरोपीचे नाव आहे.