Gadchiroli Accident: 'मन की बात' जिल्हा समन्वयक भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू; गडचिरोली येथील घटना

आनंद गण्यारपवार असे या नेत्याचे नाव आहे. ते भाजपचे जिल्हा सचिव आणि 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक होते. अपघातात (Gadchiroli Accident) त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका भाजप (BJP) नेत्याचा मृत्यू झाला आहे. आनंद गण्यारपवार असे या नेत्याचे नाव आहे. ते भाजपचे जिल्हा सचिव आणि 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक होते. अपघातात (Gadchiroli Accident) त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले राजप नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरुवारी (27 जानेवारी) सकाळी 7 वाजता हा अपघात घडला.

अतुल गण्यारपवार हे आनंद गण्यारपवार यांच्यासोबत चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे चारचाकी वाहनाने नागपूरला निघाले होते. त्यांची कार रणमोचन फाट्याजवळ आली असता समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. ट्रॅक्टरची कारला पाठीमागून बसलेली धडक इतकी जोरात होती की कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले. कारमध्ये असलेल्या एअरबॅगमुळे अतुल गण्यारपवार हे थोडक्यात वाचले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (हेही वाचा, Palghar Beach Accident: पालघर बीचवर थरारक अपघात, भरधाव कारने सहा जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, 5 गंभीर जखमी)

दरम्यान, सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे बचाव कार्यास विलंब लागला. रस्त्यावरुन दुसरे वाहन येईपर्यंत वाट पाहावी लागली. अखेर रस्त्यावरुन भाजीपाला वाहतूक करणाऱ्या एका वाहनातून तिघांनाही ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. पुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कृपाल मेश्राम यांनी अतुल गण्यारपवार यांना ब्रम्हपुरी येथील सर्वोद्रय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या हवाल्याने नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल गण्यारपावार यांच्या मानेला दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर आहे.